Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून कनाके परिवाराला आर्थिक मदत तसेच रुग्णवाहिकेची...

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून कनाके परिवाराला आर्थिक मदत तसेच रुग्णवाहिकेची व्यवस्था

27
0

अहेरी : तालुक्यातील राजाराम ( खां )येथील राजू गंगाराम आत्राम नुसार मृतक राजू आत्राम व मुलचंद कन्नाके यांनी MH-33 AF 1408 क्रमाकांचा दुचाकीने काही कामानिमित्त तेलंगाणा राज्यात जाऊन परत येत असताना अहेरी जवळील प्राणहिता नदीवरील वांगेपली-गुडेम पुला जवळ दुचाकी चालकाचा संतुलन बिघडल्याने दुचाकी पुलाजवळील खड्ड्यात आडळली यात राजू आत्राम जागीच ठार तर मुलचंद कन्नाके गंभीर जखमी झाला

गंभीर जखमी झालेल्या मुलचंद कनाके यांचा उपचार करण्यास वैद्यकिय उपचार सुरू होते.परंतु आज डॉक्टरांनी सांगितले की’त्यांच्या पाटीच्या कण्यात खुप दुःखापद झाले आहे.म्हणून त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यास सांगितले ही बाब कटुबातील नातेवाईकांनी आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना सांगितल्याने लगेच खाजगी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून त्या परिवाराला औषध उपचारासाठी आर्थिक मदत केली.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवारसह रुग्णाचे नातेवाईक तसेच स्थानिक आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here