अहेरी : प्रणहिता–अहेरी, अहेरी–महागाव आणि अहेरी–देवलमारी या महत्त्वाच्या मार्गांवरील रस्ते कामांचा दीर्घकाळ चाललेला खोळंबा अखेर दूर होत असून नागरिकांच्या तीव्र नाराजीची व कंकडालवारांचा आंदोलनची दखल घेऊन संबंधित विभागाने कामांना सुरुवात केली आहे.
या रस्त्यांची दुरवस्था आणि थांबलेली कामे यामुळे शेतकरी,विद्यार्थ्यांसह अत्यावश्यक सेवांवर मोठा परिणाम होत असल्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार व नागरिक प्रतिनिधींनी आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रव्वा यांची भेट घेतली.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनात विभागाने पूर्वी दिलेले लेखी आश्वासन प्रत्यक्षात उतरले नसल्याची खंत व्यक्त केली. सात दिवसांत कामे सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी दिला होता.
या इशाऱ्यानंतर आणि वाढत्या नागरिकांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर विभागाने तत्काळ हालचाल करत रस्ते कामांना प्रारंभ केला आहे.
स्थानिकांनी याचे स्वागत करत,सार्वजनिक दबाव आणि जनप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळेच कामे सुरू झाली. आता कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत,अशी मागणी केली आहे.अहेरी तालुक्यातील या निर्णयामुळे अनेक गावांचा संपर्क पुनर्स्थापित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Home मुख्य बातम्या काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांचा दबावाला यश : आंदोलनाची दखल घेत रस्त्यांच्या कामांना...





