Home अहेरी रानडुकराच्या हल्ल्यातील मृत वृद्धाच्या कुटूंबाला अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत

रानडुकराच्या हल्ल्यातील मृत वृद्धाच्या कुटूंबाला अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत

45
0

अहेरी : तालुक्यातील वेलगुर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोटलाचेरू येथील रहिवासी विस्तारी शिवय्या जक्कुलवार (६० वर्षे) यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी आर्थिक मदत केली.जक्कुलवार हे काल नेहमीप्रमाणे सायंकाळी जंगलातून म्हशींना आणल्यानंतर घरासमोरील अंगणात त्या बांधल्या. बाजुला त्यांना म्हशीच्या वगारासारका प्राणी दिसला. पण तो रानडुक्कर होता हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे त्यांनी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला असता काही कळायच्या आत विस्तारी यांच्यावर रानडुकराने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. त्या अवस्थेत त्यांचा मुलगा, नातेवाईक व गावातील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे भरती केले. पण डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्यास सांगितले पण घरातील मंडळींनी नकार दिला. पण अजय कंकडालवार यांनी पुढील काही दिवसात वनविभागाला व इतर काही ठिकाणी शवविच्छेदन अहवालाची प्रत आवश्यक असल्याचे समजावून सांगितल्यावर नातेवाईकांनी होकार दिला. शवविच्छेदन करून त्यांना गाडीची व्यवस्था करून दिली.

जक्कुलवार यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तिसऱ्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमासाठी कंकडालवार यांनी आर्थिक मदत करणार असल्याचे त्यांच्या कुटूंबाला सांगितले. यावेळी प्रशांत गोडसेलवार, राकेश वर्दलवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here