अहेरी : आदिवासींच्या अन्यायाला वाचा फोडणारे आणि ब्रिटिशांविरोधात उलगुलान आंदोलन उभारणारे क्रांतीकारी स्वातंत्र्यसैनिक आणि मुंडा जमातीचे लोकनायक बिरसा मुंडा यांची १५ नोव्हेंबर रोजी जयंती असून आलापल्ली नगरीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली आहे.
काल भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त आदिवासी उत्सव समिती तर्फे जयंती कार्यक्रम आयोजित केले आहे.कार्यक्रमला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हणमंतू मडावी यांनी उपस्थिती दर्शवून भगवान बिरसा मुंडा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.दरम्यान अजय कंकडालवार व हणमंतू मडावी यांची समिती पदाधिकारी व सदस्यांकडून सत्कार करण्यात आली.तसेच कंकडालवारांकडून कार्यक्रमला देणगीही देण्यात आली आहे.





