सिरोंचा : तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विविध पदांसाठीची पदभरती जाहिरात दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार 10 डिसेंबर पर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. परंतु ही जाहिरात अर्धवट आहे.यामध्ये परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घेण्यात येणार आहे.हे सांगितलेले नाही व परीक्षेचे स्वरूप काय असेल हे सुद्धा दिलेले नाही.
तसेच परीक्षेची संभावित तारीख पण दिलेली नाही.या पदभरतीत यापूर्वी दोनदा पेपरफुटीचे प्रकरण झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविला होता.त्यामुळे ही भरती दोनदा रद्द करण्यात आली होती.त्याचप्रमाने यावेळी सुद्धा अशे प्रकरण होण्याची दाट शक्यता आहे.काही लोकांकडून पैशांची लाच घेऊन पेपरफुटी प्रकरण हे पुन्हा होऊ शकते.त्यामुळे लायकी नसलेले विद्यार्थी हे पैशांच्या जोरावर नियुक्त होऊ शकतात.त्यामुळे जे विद्यार्थी मेहनतीने अभ्यास करून परीक्षेची तयारी करत आहेत.
त्यांच्या मनात संभ्रमाची स्थिती निर्माण होत आहे.याकरिता ही पदभरती पारदर्शक पणे पार पडावी म्हणून ही परीक्षा माननीय जिल्हाधिकारी – तहसीलदार साहेब यांच्या देखरेखीत जिल्हा निवड समिती मार्फत अथवा TCS किंवा IBPS या नावाजलेल्या कंपन्यामार्फत घेण्यात यावी.विद्यार्थ्यांची मागणी आहे.तरी या प्रकरणी उचित कार्यवाही करुन विद्यार्थ्यांच्या मागणीला न्याय मिळवुन द्यावे असे.विनंती सदर निवेदना द्वारे करण्यात आले.तसेच प्रतिलिपी द्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,सहकार पणन व वस्त्र उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य.
2) मा. विजय वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य.
3) मा.पणन संचालक महाराष्ट्र राज्य,पुणे
4) जिल्हा उपनिबंधक सहकार विभाग गडचिरोली.
यांनद्वारे उचित कार्यवाही चा विनंती केले.