अहेरी : तालुक्यातील आलापल्ली अंतर्गत येत असलेल्या मद्दीगुडाम येथील अजयभाऊ कंकडालवार मित्रपरिवार तर्फे भव्य टेनिस बाॅल रात्रकालीन 30 यार्ड क्रिकेट स्पर्धेची आयोजन केली आहे.या रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेची आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली.
सदर या क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हणमंतू मडावी – वेलगुर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोक येलमुले कडून देण्यात येत आहे.तसेच तृतीय पारितोषिक लाॅयड्स मेटल्स कंपनी कडून देण्यात येत आहे.या क्रिकेट स्पर्धेसाठी असे तीन पुरस्कार ठेवण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते.विशेष अतिथी म्हणून वेलगुर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोक येलमुले – मद्दीगुडामचे पोलीस पाटील बशीरभाई शेख होते.प्रमुख पाहुणे म्हणून नंदू तेलामी – सरपंच गीताताई चालूरकर – खोब्रागडे साहेब – रियाज शेख – नरेश मडावी – मल्लेश तोटावार – अनुराधा सरदार – किशोर आत्राम – जि.प.शाळा मद्दीगुडाम शिक्षक वृंद – ग्रामपंचायत सरपंच सचिव कर्मचारी वृंद होते.
यावेळी उदघाटन प्रसंगी उपस्थित परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक – मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होती.
Home सामाजिक माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते रात्रकालीन...