Home मुख्य बातम्या रस्त्याचे काम त्वरित करा अन्यथा आंदोलन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार

रस्त्याचे काम त्वरित करा अन्यथा आंदोलन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार

14
0

अहेरी ;-तालुक्यातील रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला तीव्र आवाहन केले आहे की अहेरी प्राणहीता रस्त्याचे व अहेरी वेंकटरावपेठा रस्त्याचे मंजूर काम तात्काळ पूर्ण करावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार जाहीर केला आहे. या विषयावर सार्वजनिक बांधकाम अधिकारी आलापल्ली यांना निवेदन देऊन विनंती केली आहे.

अहेरी प्राणहीता रस्त्याचे व अहेरी वेंकटरावपेठा रस्त्याचे काम मंजूर झाल्यानंतर देखील, कंत्राटदारांनी अर्धवट काम करून ठेवले आहे.वारंवार अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार व दूरध्वनि द्वारे सांगूनही कामे चालू करण्यात आली नाहीत. या कामांची जबाबदारी संबंधित विभागाची असूनही, कंत्राटदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाल्याचे दिसून येत नाही, कंत्राटदारांना पत्र व्यवहार करून त्यांना काळ्या यादीत टाकावे व त्यांच्याकडून पुन्हा कामे सुरू असल्यास त्याची संपूर्ण चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी. या सर्व गोष्टींची दक्षता घेऊन रस्त्याचे काम तात्काळ चालू करावे, अन्यथा आंदोलन करणार अशे म्हटले आहे

आंदोलनाची तारीख
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी अहेरी प्राणहीता रस्त्यावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, व दिनांक 04 मार्च 2024 रोजी अहेरी वेंकटरावपेठा बामणी क्रॉसिंग जवळ रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल.असा इशारा दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here