अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत नागेपल्ली अंतर्गत येत असलेल्या मोदूमडगू येथील श्री.हरी गुरू चांद मंदिर मोद्दूमडगु येथे नवीन हात पंप – मौजा मोद्दूमडगु येथील मुख्य रस्त्यापासून ते मलेश गुरूडवार यांचे घरापर्यंत सि.सी रोड – नालीचे बांधकामाचे भूमिपूजन आविसं काँग्रेसचे युवा नेते व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
अनेक दिवसांपासून यासाठी मागण्या रेटून धरला असता माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सरपंचांना सांगून ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त योजने अंतर्गत मंजुरी देऊन सदर कामाचे भूमिपूजन केले आहेत.
या”भूमिपूजन सोहळ्याला आदिवासी काँग्रेस सेलचे जि.अध्यक्ष तसेच सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी,नागेपल्ली ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण कोडापे,उपसरपंच रमेश शानगोंडावार,करिश्मा आत्राम ग्रा.प.सदस्या,बेबीताई मंडल ग्रा.पं.सदस्या,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,आविस कार्यकर्ते सदन मालाकर,रणजित हल्डार,मनान मामु,प्रेमिला मिस्त्री,हरिदास जी,निखिल मंडल,मनिंद्रा बाला,मलेश गुरुडवार,लचय्याजी बंडावार,नंदू आचेवार,कार्तिक तोगम उपसरपंच मरपल्ली,नरेश गर्गम,किशोर दुर्गे,संतोष येनगंट्टीवारसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समस्त मोद्दूमडगु गावकरी उपस्थित होते
Home अहेरी जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते ग्रामपंचायत नागेपल्ली येथे विकासकामांचे भूमिपूजन