Home मुख्य बातम्या भिमरगुडा येथील वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई तूर्तास स्थगित

भिमरगुडा येथील वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई तूर्तास स्थगित

4
0

अहेरी : रेपनपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या भिमरगुडा येथील नागरिकांनी तीस ते चाळीस वर्षांपासून वनजमिनीवर अतिक्रमण करून शेती करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत आहे.वनविभाकडून अतिक्रमण धारकांना यापूर्वी नोटीसा बजावून जमिनीचे योग्य पुरावे सादर करण्यास सांगितले होते.परंतु मुदतीत पुरावे सादर न केल्याने वनविभागाकडून अतिक्रमण हटविण्याचे कारवाईला सुरुवात करण्यात आली होती.

या कारवाईची माहिती येथील अतिक्रमणधारकांनी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांना दिली असता त्यांनी घटनास्थळी पोहोचून वनविभाग व पोलीस विभाग यांच्यात मध्यस्थी करून अतिक्रमण धारक पुरावे सादर करेंपर्यंत सदरहू अतिक्रमण हटविण्याची कारवाई तूर्तास स्थगित करण्याची विनंती केले होते.

यावेळी वनविभाग आणि पोलीस विभागाने गावात गावकरी आणि अतिक्रमण धारकांची बैठक घेतली होती.या बैठकीत अजयभाऊ कंकडालवार यांनी अतिक्रमण धारकांची उचित बाजू मांडत अतिक्रमण धारक शेतकरी पुरावे सादर करेपर्यंत कारवाई तूर्तास स्थगित करण्याची विनंती केले होते.वनविभागाने पंधरा दिवसापर्यंत अतिक्रमण हटविण्याची कारवाई तूर्तास स्थगित केले.

अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची बाजू मांडत असतांना कंकडालवार आणि सिरोंचाचे उपवनसंरक्षक माननीय पोटे मॅडम याच्यात शाब्दिक बाचाबाची उडाली होती.गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होता.यावेळी गावकरी आणि अतिक्रमण धारक शेतकऱ्यांनी कंकडालवार यांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिले होते…हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here