Home अहेरी काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार कडून सर्पदंश झालेल्या संदीप पोरतेट याला आर्थिक मदत

काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार कडून सर्पदंश झालेल्या संदीप पोरतेट याला आर्थिक मदत

3
0

अहेरी : राजाराम कोकपरी येथील शेतकरी संदीप अर्जुन पोरतेट हा शेतात फवारणी करत असतांना सर्पदंश झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

या घटनेची माहिती स्थानिक कार्यकर्ताकडून काँग्रेस नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना कळताच त्यांनी लगेच आपल्या आल्लापल्ली येथील एका कार्यक्रम अर्ध्यावर्ती सोडून उपजिल्हा रुग्णालय गाठून सर्पदंश झालेल्या पुरुषाला भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची माहिती घेतली.

तसेच यावेळी कंकडालवार यांनी सर्पदंश संदीप पोरतेट यांची योग्य व काळजीपूर्वक उपचार करण्यासाठी संबंधित डॉक्टराला सांगितले.तसेच रुग्णाचे नातेवाईकांना सर्वतोपरी मदतीचे शब्द देत कशाचेही मदत लागल्यास फोनवर माहिती देण्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here