Home अहेरी मृतदेह स्व:गावी पोहोचविण्यासाठी कंकडालवार यांनी करून दिली खाजगी रुग्णवाहिकेची व्यवस्था

मृतदेह स्व:गावी पोहोचविण्यासाठी कंकडालवार यांनी करून दिली खाजगी रुग्णवाहिकेची व्यवस्था

1
0

अहेरी : तालुक्यातील शिवणीपाठ येथील साई सीताराम कुळमेथे यांना अचानक मिरगी आल्याने अचानक खाली कोसळले होते.त्यांना पुढील उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

परंतु येथील डॉक्टरांनी उपचारा दरम्यान त्यांना मृत घोषित केले होते.मृतकाची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत अलाखिची असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्याशी संपर्क करून मृतकाची परिस्थिती सांगितले असता?

त्यांनी मृतकाचे मृतदेह त्यांचे स्व:गावी शिवणीपाठ येथे नेण्यासाठी त्यांना खाजगी रुग्णवाहीका उपलब्ध करून दिले.

मृतकाचे कुटुंबियांनी या सामाजिक कार्याप्रति काँग्रेस नेते कंकडालवार यांचे समाधान व्यक्त करत आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here