अहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम गोल्लाकार्जी येथील माजी कॅबिनेट मंत्री तथा विरोधी पाक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया / महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डाॅ.नामदेवराव किरसान साहेबांचा निवडणुक प्रचारार्थ गोलाखर्जी गावात प्रचार सभा आयोजित केली आहे.
प्रचार सभेला काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी प्रचार सभेला प्रामुख्याने उपस्थित राहून नागरिकांना संबोधित केले की’इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ.किरसान साहेबांना मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे सांगितले.यावेळी नागरिक काँग्रेस पक्षाला मत देऊ असे स्पष्ट केले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी जि.प.सदस्य सुनीत कूसनाके,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगर पंचायत अहेरी ,भास्कर तलांडे माजी सभापती अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,सचिन पांचार्यासह गावातील नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.
Home राजकीय महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डाॅ.किरसान साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करा : कंकडालवार