Home अहेरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी घरी उभारली गुढी

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी घरी उभारली गुढी

1
0

अहेरी :  गुढीपाडवा निमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी सपत्नीक आज आपल्या निवासस्थानी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले.यानिमित्त त्यांनी मराठी बांधवांना आणि जनतेला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा सण असून,यानिमित्त घरोघरी गुढी उभारून आनंद साजरा केला जातो.अजय कंकडालवार यांनीही परंपरेनुसार आपल्या घरी गुढी उभारली आणि नववर्ष सुख-समृद्धीचे जावो,अशी प्रार्थना केली.गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.शहरभरात आणि ग्रामीण भागातही गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी आई मंदाबाई रामय्याजी कंकडालवार,युवराज कंकडालवार,विराज कंकडालवार,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,अथर्व मल्लेलवार,प्रमोद गोडसेलवारसह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here