Home मुख्य बातम्या आंदोलनाचा इशारा देताच सुरू झाले महागाव-सुभाषनगर मार्गाचे डांबरीकरण : सार्वजनिक बांधकाम विभागाने...

आंदोलनाचा इशारा देताच सुरू झाले महागाव-सुभाषनगर मार्गाचे डांबरीकरण : सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल

79
0

अहेरी : तालुक्यातील महागाव-सुभाषनगर या रस्त्याची दुरवस्था होऊन काही महिन्यांपूर्वी मोठे खड्डेही पडले होते. त्यामुळे अहेरी-महागाव-सुभाषनगरपर्यंत नवीन डांबरीकरण करा.अन्यथा सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.असा इशारा आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी दिला होता.त्याची दखल घेत अखेर या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.अहेरी-महागांव- सुभाषनगर या मुख्य मार्गावर खड्डे पडल्यामुळे रुग्णालयात येणारे रुग्ण तसेच शालेय विद्यार्थ्याना,गर्भावती महिलांना या रस्त्यावरून जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जीव धोक्यात घालून त्यांना प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे याकडे लक्ष देऊन या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम आठवडाभरात सुरू करा.अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.असा इशारा माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी दिला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाला अधिकाऱ्यांशी त्यांनी याबाबत मोबाईलवरून चर्चा केली होती.त्याची दखल घेत हे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास आता वाचणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here