Home राजकीय एटापल्ली मुख्य रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा- सभापती राघवेंद्र सुल्वावार यांची मागणी

एटापल्ली मुख्य रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा- सभापती राघवेंद्र सुल्वावार यांची मागणी

56
0

एटापल्ली : नगरपंचायत एटापल्ली हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून या ठिकाणी येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक व दळणवळण सुरू असते.परंतु येथील मुख्य रस्त्यावर मोठं-मोठे खड्डे पडलेले असून पावसामुळे तेथे पाणी साचल्यामुळे याठिकाणी अपघात होऊन जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच येथील खड्ड्यातील साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असून तेथील लोकांच्या आरोग्यास सुद्धा धोका उदभवण्याची शक्यता आहे.तरी सदर मुख्य रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे अशी मागणी मेल द्वारे मा.कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली तसेच प्रतिलिपी पत्राद्वारे मा.कार्यकारी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग एटापल्ली यांना कळविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here