गडचिरोली : जिल्हा हा अतिदुर्गम आदिवासी, डोंगराळ व नक्षल प्रभावित असून जिल्ह्याचे भौगोलीक क्षेत्र दूरवर पसरलेले आहे.गडचिरोली ते अहेरीचे अंतर 115 कि.मी.असून अहेरीच्या आसपासच्या लोकवस्ती हे आदिवासी बहुल आहे.अहेरीची भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन येथील जनतेला शासनाच्या विविध कल्याणकारी योजना अत्यंत अडचणीचे ठरत होता.परिसर नक्षलग्रस्त असल्यामुळे गडचिरोलीचे जिल्हाधिकाऱ्यांनाही प्रसंगी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नियंत्रण ठेवणे शक्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता.म्हणून राज्यसरकारने गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती विचारात घेता अहेरी येथे 1 एप्रिल 2010 पासून अपर जिल्हाधिकारी पद मंजूर करून कार्यालयही कार्यान्वित करण्यात आला होता.तसेच या कार्यालयाशी अहेरीसह भामरागड,सिरोंचा आणि एटापल्ली या चार तालुक्यांना संलग्न करण्यात आला होता.या चार तालुक्यांची उपविभाग म्हणून संबंधित अपर जिल्हाधिकारी अहेरी यांच्या अधिपत्याखाली ठेवण्यात आला.
राज्यसरकारने त्यावेळी शासन निर्णय क्रमांक :अजिका 2009/प्र.क्र.187 (01/10)म-10 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम13(3)अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना असलेले अधिकारही प्रस्तुत अहेरीसह भामरागड,सिरोंचा आणि एटापल्ली या चार तालुक्यांपुरते अपर जिल्हाधिकारी अहेरी यांना जिल्हाधिकारी पदाचे अधिकारही प्रदान करण्यात आले होते. परंतु या चार तालुक्यांपुरते अपर जिल्हाधिकारी अहेरी यांनी आपल्या जिल्हाधिकारी पदाचा नीट अंमलबजावणी करतांना दिसून येत नसल्याचे खंत माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी व्यक्त केले.किमान आतापासून शासन निर्णयानुसार अपर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्हाधिकारी पदाच्या नीट अंमलबजावणी करून शासन निर्णय प्रक्रियेतील त्या चार अविकसित तालुक्यातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहचिण्याचं कार्याला गती देण्याची मागणीही काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.
अहेरीसह भामरागड सिरोंचा आणि एटापल्ली या चार तालुक्यातील नागरिक नेहमी विविध कार्यालयी कामांसाठी व समस्यांचे निवेदने सादर करायला गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जात असतात.परंतु या चारही तालुक्यातील नागरिकांसाठी अपर जिल्हाधिकारी अहेरी यांच्याकडेच जिल्हाधिकारी पदाचे अधिकार असल्याबाबत माहितीसह जनजागृती करण्यात आलं नाही.त्यामुळे त्या चार तालुक्यातील नागरिकांना गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात फेरफटका मारण्यात उगाच आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.म्हणून अपर जिल्हाधिकारी अहेरी यांनी राज्य सरकारने 2010 पासून त्यांना प्रदान केलेल्या जिल्हाधिकारी पदाचा नीट अमंलबजावणी करून त्या चारही अविकसित तालुक्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून येथील नागरिकांची समस्यांची आपल्या स्तरावरूनच सोडवणूकीचे प्रामाणिक प्रयत्न करावं ,असे मतही यावेळी काँग्रेसचे युवा नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी व्यक्त केले.
Home मुख्य बातम्या अपर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘त्या’ चार तालुक्यांपुरता जिल्हाधिकारी पदाचा नीट अमंलबजावणी करावं