लोकसभा निरीक्षक बेलय्या नाईक,विद्यामन माजी जि.प.अध्यक्ष तथा काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा समन्वयक अजय कंकडालवार,आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत
अहेरी : विधानसभा आगामी विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळविण्यासाठी राज्यात काँग्रेस पक्षाने कार्यकर्ता प्रशिक्षण सुरू केली असून.अहेरी विधानसभा मतदारसंघात शेकडो निवड कार्यकर्त्यानी हे प्रशिक्षण शनिवारी वासवी सेलिब्रेशन हालमध्ये देण्यात आले.कांग्रेसचा इतिहास आणि सत्ताधाऱ्यांचा फसव्या घोषणांची माहिती या प्रशिक्षनातुन देण्यात असल्याची मा.जिल्हापरिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि आलेल्या मान्यवरांच्या माध्यमातून दिली.
यावेळी उपस्थित जिल्हापदाधिकारी व तालुका पदाधिकारी तसेच आजी माजी नगरसेवक तथा आजी माजी सरपंच,उपसरपंच व सदस्य हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.त्या तुलनेत भाजपचा जन्म अलीकडच्या आहे.कांग्रेसने नव्याने येणाऱ्याना शिस्त आणि इतिहासाची ओळख करून देण्यासाठी राहुल गांधीच्या पुढाकारात हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर सर्वत्र घेतले जात आहे.आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी जाऊन अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
असून त्याच्या फायदा आगामी निवडणूकामध्ये होणार असल्याचे दावाही अजयभाऊ कंकडालवार यांनी केला आहे.लीडरशिप इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून राज्यात हे प्रशिक्षण देत आहेत.प्रशिक्षनात कांग्रेसने या 60 वर्षात केलेला विकास आणि बदल सांगितले जात असून भाजपा-मोदी सरकारच्या 10 वर्षातील फसव्या बाबीवरही बोट ठेवण्यात आले आहे.असे त्यांनी सांगितले.कांग्रेसची विचारधारा सर्वधर्मसमभावाची आणि राष्ट्रीय एकात्मतेचि आहे.सर्वसामान्य लोकांना याबाबी पटवून सांगण्याचे कार्य हे कार्यकर्ते करतील असेही ते म्हणाले.
प्रकरणी काँग्रेस भाजपाप्रमाणे राजकारण करणार नाही.देशाची एकजुटता दर्शविण्यासाठी ही वेळ असल्याचे ते एका प्रश्नःची उत्तरात बोलले.कांग्रेस कार्यकाळातील योजना नाव बदलून समोर आणल्या!कांग्रेस कार्यकाळातील विविध योजनावर कांग्रेसचे कार्य सुरु होते.सामान्य माणसाला महागाई छळणार नाही.याचा विचार करून कांग्रेसने या योजना आणल्या होत्या.मात्र भाजपा-मोदी सरकारने केवळ थापा दिल्या.दहावर्षातील त्यांचे आश्वासन त्यांनीच पहावं म्हणजे समजेल.या सर्व बाबींचादेखील प्रशिक्षण समावेश असल्याचे येथे सांगितले गेले.
Home अहेरी सत्ता मिळविण्यासाठी अहेरी विधानसभा मतदारसंघ वासवी सेलिब्रेशन हालमध्ये काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण (...