Home अहेरी पूरग्रस्त नाल्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू; कंकडालवारांची तत्काळ मदत

पूरग्रस्त नाल्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू; कंकडालवारांची तत्काळ मदत

9
0

अहेरी : महागाव खुर्द येथील बिचू रामा सडमेक या शेतकऱ्याचा काल (२० जुलै) संध्याकाळी पूर आलेल्या नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. काही कामानिमित्त शेताकडे जात असताना अचानक आलेल्या पूरामुळे तोल जाऊन नाल्यात पडल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सडमेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच, त्यांच्यावर आर्थिक अडचणींचा भारही निर्माण झाला होता. शव अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे समस्या निर्माण झाली होती.ही परिस्थिती लक्षात घेऊन कंकडालवारांनी त्वरित खाजगी वाहन उपलब्ध करून दिले. इतकेच नव्हे तर मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठीही आर्थिक मदत करत संवेदनशीलता दर्शवली.

यावेळी महागाव ग्रामपंचायत सदस्य राजू दुर्गे, श्रीनिवास आलम, गणेश चौधरी, दामाजी सडमेक, हणमंतु चेन्नरुवार, संतोष मरपल्लीवार, चंद्रकला कोडापे (पोलीस पाटील, महागाव), प्रविण दुर्गे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाने अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here