अहेरी : मुसळधार पावसाने जिकडे तिकडे जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे अशातच घराची स्थिती बिकट असल्याने व पावसाचे दिवस असल्याने घर दुरुस्ती करिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कांकडालवार यांनी आर्थिक मदत केली आहे.
मुन्नीजाणी शेख व पोचूबाई सिडाम,मुरूमखदान यांना पावसाच्या दिवसात घर दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने व त्यांच्या आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने घर दुरुस्ती करणे अवघड होत होते. मात्र कंकडालवार हे नेहमीच मदतीला धावून येत असतात त्याचाच प्रत्येय आता आला.असून या दोघा महिलांना कंकडालवार यांनी मदतीचा हात पुढे करत आर्थिक मदत केली. मुन्नीजाणी शेख व पोचूबाई सिडाम यांनी कंकडालवार यांचे आभार मानले.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत,नगरसेवक विलास गलबाले,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नगरसेवक श्याम ओंडरे,नगरसेवक महेश बाकेवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोडसेलवार,राकेश सडमेक,लक्ष्मण आत्राम,प्रकाश दुर्गे,नरेश गर्गमसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.