अहेरी : तालुक्यातील देचलीपेठा येथील जय जितम ग्रुप द्वारा भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे आयोजित केले आहे.क्रिकेट सामन्याचे उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली.कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी होते.
त्यावेळी क्रिकेट हा खेळ आज अनेक युवकांमध्ये लोकप्रिय झाले असून हा खेळातून प्रत्येक खेळाडूंना आनंद द्विगुणित करता येते.या खेळाचे क्षेत्रस्तरीय स्तरावर एक वेगळी ओळख असून स्पर्धात्मक खेळ जिंकण्यासाठी खेळाडूंनी कठोर परिश्रम घेणे आवश्यक असले तरी क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूंना शारीरिक व भावनिक कल्याणाचा प्रोत्साहन मिळत असल्याचे प्रतिपादन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांनी केले.
क्रिकेट स्पर्धेला काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून पाहिलं पारितोषिक देण्यात येत आहे.तसेच दुसरा पारितोषिक शिवराम पुल्लूरी,अभिनखान पठाण,अर्शद अय्युब कडून तिसरा पारितोषिक जय जितन ग्रुप कडून देण्यात येत आहे.या स्पर्धेला अशी तीन पुरस्कार ठेवण्यात आली आहे.
त्यावेळी अजय कंकडालवार व हणमंतु मडावी यांच्या मंडळकडून स्वागत,सत्कार करण्यात आली.सर्व प्रथम माता सरस्वती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,बिरसा मुंडा प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,गडचिरोली जि.प.माजी सदस्य अजय नैताम,माजी सभापती सुरेखा आलम,माजी उपसरपंच अशोक येलमुले,शिवराम पुल्लूरी,प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील क्रिकेट प्रेमी तसेच काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.