अहेरी : तालुक्यातील लिंगमपल्ली येथील जेष्ठ महिला गरतूबाई जलमा मडावी ही काल घरी एका कार्यक्रमात काम करतांना अचानकने डोक्याला जबर मार लागल्याने आजीला तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे भर्ती करण्यात आली.
उपजिल्हा रुग्णालय डॉक्टरांनी डोक्याची पाहणी करून सिटी स्कयान आवश्यक असल्यामुळे हिला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आली आहे.मडावी परिवार अंत्यत हलखीची असल्याने त्याला चंद्रपूर जाण्यासाठी खूपच अडचण भासत होती.या विषय बाबत अजय कंकडालवार कार्यकर्ता कडून माहिती मिळताच माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी तात्काळ आजीला चंद्रपूर जाण्यासाठी खाजगी वाहन उपलब्ध करून दिले.तसेच औषध व उपचारासाठी आर्थिक मदत केले.
दरम्यान कंकडालवार सांगितले की समोर कोणत्याही अडचण भासल्यास आपण सदैव आपल्या पाठीशी असल्याचे सांगत मडावी कुटुंबाला मोठा धीर दिले.मडावी परिवारातील समस्त सदस्यांनी अजयभाऊंचे आभार मानले.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,कुमार गुरानुले,महेश गेडाम,तशु शेख,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोडसेलवार,राकेश सडमेक, प्रकाश दुर्गेसह काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.