सिरोंचा : तालुक्यातील 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंकीसा भागातील जोडेपल्ली गावातील एका गरीब कुटुंबातील मुलगी कु-पुष्पा एसेब जाडी यांनी
नीट परीक्षा उत्तीर्ण होऊन वैद्यकीय क्षेत्रात MBBS साठी निवड झाली आहे.सिरोंचा तालुका हा गडचिरोली जिल्ह्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळखले जाते अशा तालुक्यातील जोडेपल्ली गावातून नीट परीक्षा उत्तीर्ण झाले आहे.कुमारी- पुष्पा जाडी यांची कौतुक करावे या साठी सिरोंचा तालुक्यातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे मूलकला फाउंडेशनचे अध्यक्ष – सागर भाऊ मूलकला,यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनचे सदस्यांनी जोडेपल्ली गावात जाडी कुटुंबियांना भेट देऊन कुमारी – पुष्पा जाडी यांची शाल श्रीफळ देऊन सत्कार करून गौरविण्यात आले आहे
त्यावेळी मूलकला फाउंडेशनचे सदस्य – राजू मूलकला,उदय मूलकला,कल्याण मूलकला,संतोष मूलकला, राजेश तालरी, अनिल दुर्गम,नवीन अकुदारी,यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते