सिरोंचा : तालुक्यातील पेंटीपाका ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लंबडपल्ली येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सम्मक्का -सारक्का देवींची यात्रा शेकडो भक्तजणांच्या उपस्थितीत मोठ्या उत्सहात पार पडली.
यात्रेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांचाकडून देवस्थान मंडळाला आपल्यापरीने आर्थिक देणगी देण्यात आली.
काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी पाठविलेल्या देणगी येथील माजी सरपंच सोमय्या गादे,सोशल मीडिया प्रमुख संपत गोगुला,श्रीकांत अंतर्गम व इतर कार्यकर्त्यांनी देवस्थान मंडळाचे पुजाऱ्यांकडे सुपूर्द केले.सम्मक्का-सारक्का देवींची यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडली आहे.
यावेळी पुजारी अकुदारी समय्या,जिमडे श्रीनिवास,कुम्मारी लचय्या,कुम्मारी राजामालू,दिकोंडा कालिदास,अकुदारी सडवाली,साई मोर्ला,चंद्रशेखर जनगम,महेश पोट्टाला,नवीन कुम्मारी,वेंकटेश पोट्टाला,बिरेल्ली शंकर,जोडे समय्या,गणपती कुम्मारी,जाडी नागेश,दुर्गम रामचंद्र,श्रीनिवास दिकोंडा यांच्या सह स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते व समस्त गावकरी,परिसरातील शेकडो भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.





