अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुका येथील सूरजागड कंपनी स्थापना केलेले पासून आज पर्यंत सुरजागड वाहना मुळे अनेक शेतीचे नुकसान होत.सुरजागड वाहनामूळे लोकांचे जीव जात आहे. तसेच रस्ताला खड्डे होऊन होत आहेत सूरजागडचे वाहन मद्दीगुड्डम ,आलापली मार्गे सुरू आहेत मात्र वेलगुर मार्गी शंकरनगर, तानबोडी या गावात रस्त्यानी सदर वाहन सुरू करण्यात येईल असे चर्चा सुरू असून मद्दीगुडम येते वनविभागाच्या जागा असून येते कम्पनी कसल्याही परवानगी ना घेता डम्पिन्गयार्ड बनवून कच्चा माल साठवनुक करून या मार्गी नेणार आहेत मात्र रस्त्यालगत शेती,घरे आहे.सुरजागळाचे वाहनमूळे रस्ता चालू झाले तर धुळीमुळे शेतीची नुकसानी होईल म्हणून सुरजागळच्या वाहन नेण्यासाठी गावातून नेण्यापेक्षा गावाच्या बाहेरून रस्ता बनवून नेण्यात यावी म्हणून तानबोळी खमनचेरू रस्त्यावरून सुरजगळाचे वाहन जाण्यास व डम्पिंगयार्ड साटी स्थानिक गावकऱ्यांनी विरोध दर्शविनात आले.