Home अहेरी महागाव येथे सल्ला गांगरा शक्तीचे अनावरण व सप्तरंगी ध्वजारोहण ; सामूहिक विवाह...

महागाव येथे सल्ला गांगरा शक्तीचे अनावरण व सप्तरंगी ध्वजारोहण ; सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रम उत्सहात संपन्न

1
0

अहेरी : तालुक्यातील महागाव येथील आज सल्ला गांगरा शक्ती महागाव कॅम्प येथे सल्ला गांगरा शक्तीचे अनावरण व सप्तरंगी ध्वजारोहण तसेच सामूहिक विवाह सोहळा गावकरी,आदिवासी बांधवांच्या उपस्थित उत्सहात पार पडले आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांचा हस्ते करण्यात आली आहे.

त्यावेळी कार्यक्रमांचे सहउदघाटक म्हणून गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय नैताम होते.विशेष अतिथी म्हणून माजी सदस्य सुनीता कूसनाके,माजी सभापती सुरेखा आलम हे होते.

यावेळी अजयभाऊंची आदिवासी संस्कृतीत विविध नूत्या करत जंगी स्वागत केली.तसेच मंडळ व गावाकरी कडून सत्कारही करण्यात आली.

कार्यक्रमाचे औचित्य साधून येथील चार जोडप्यांचे एकच मंडपात सामूहिक लग्ना काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते सोहळा पार पाडले आहे.त्यावेळी अजय कंकडालवार यांचाकडून या चार जोडप्यांना विविध वस्तू देऊन शुभ आशीर्वाद देत पुढीलवाटचालीस शुभेच्छा दिले.

यावेळी सत्यनारायण कोडापे,कालिदास कूसनाके,दिपील मडावी सरपंच,शायलू मडावी सरपंच,महागाव ग्रामपंचायतचे सरपंच वंदना दुर्गे,ग्रामपंचायत सदस्य राजू दुर्गे,रमेश पेंदाम,वेंकटेश धानोरकर,श्रीनिवास आलम,गणेश चौधरी,रामूलू कुळमेथे,मीना वेलदी सरपंच राजपूर पॅच,साईनाथ कुकुडकर यांच्या सह स्थानिक,परिसरातील आदिवासी बांधव व समस्त गावकरी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here