Home मुख्य बातम्या वनरक्षक पदभरतीत अनुसूचित क्षेत्र वगळता आदिवासी युवकांसाठीही पद भरावे : संतोष...

वनरक्षक पदभरतीत अनुसूचित क्षेत्र वगळता आदिवासी युवकांसाठीही पद भरावे : संतोष ताटीकोंडावार यांची वनमंत्र्यांकडे निवेदनातून मागणी

91
0

गडचिरोली : शासनाच्या वनविभाग खात्याद्वारे वनरक्षक ‘गट क’ पद भरती घेण्यात येत असून याअंतर्गत 30 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.मात्र या पद भरतीत गडचिरोली जिल्ह्यात अनु. जमातीकरिता अनुसूचित क्षेत्रातील उमदेवारांसाठी पदभरती राबविण्यात येत आहे.तर बिगर अनुसूचित क्षेत्रात येणा-या विद्यार्थ्यांना या पदभरतीपासून वंचित ठेवल्या गेले आहे. यामुळे तलाठी भरतीप्रमाणे वनरक्षक भरतीतही गैरआदिवासींवर अन्याय होत आहे. त्यामुळे या पद भरतीत वाढ अनुसूचित क्षेत्र वगळता आदिवासी युवकांसाठीही पद भरण्यात यावे, अशी मागणी करीत भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर करीत लक्ष वेधले आहे.निवेदनात म्हटले आहे की, वनरक्षक पद भरती ऑनलाईन प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गैरसमजीमुळे अनेक अडचणी येत आहेत.अर्ज भरताना अनावधनाने चुका होत झाल्यास परत अर्जात सुधारणा किंवा बदल व अर्ज रद्द करण्याचा अवधी देण्यात आलेला नाही.परिणामील अनेक विद्यार्थी वनरक्षक पद भरती प्रक्रियेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अर्जात बदल किंवा सुधारणा करण्याचा वा अर्ज रद्द करण्याचा पर्याय ठेवण्याल विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्यास मदत होऊ शकतो. तसेच खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये तर आरक्षीत प्रवर्गासाठी 900 रुपये एवढे अवाढव्य शुल्क आकारण्यात येत आहे. आरक्षीत प्रवर्गातील उमेदवार सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेले असल्याने प्रवेश शुल्काचे दर कमी करावे,पद भरतीत गैरआदिवासींनाही संधी देण्यासाठी वनरक्षक पदामध्ये वाढ करण्यात यावे, अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here