अहेरी टुडे तालुका प्रतिनिधी अहेरी ( Aheri )
अहेरी शहरातील शुभम पुज्जलवार, नागेश वाकुडकर, भूमय्या संगमवार,यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी या सर्वांच्या निवासस्थानी जाऊन कुटूंबियांचे सांत्वन केले. प्रसंगी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबियांना धीर दिला.यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते