अहेरी : नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 14 भोई मोहोला येथील गंगा देवी मंदिर येथे सुमार 40 ते 50 वर्षींपासून मंदिरात भोई समाजा कडून पूजेचा कार्यक्रम आयोजित केले जात आहे.यावर्षी सुद्धा गंगा देवी पूजा कार्यक्रम मोठया थाटात संपन्न झालं आहे.
भोई समाजा कडून पूजेच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना निमंत्रण देण्यात आली होते निमंत्रनाला मान देऊन आज गंगा देवी पूजा कार्यक्रमाला अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून गंगा देवीची विधिवत पूजा अर्चना करून देवीची दर्शन घेतले.
त्यावेळी कंकडालवारांनी देवीच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केली तसेच येथील स्थानिक समस्या जाणून घेत गंगा देवी मंडळाला वर्गणी देण्यात आली.
यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,कुमार गुरनुले,अजय नैताम,कार्तिक तोगम,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवार,ताशूभय्या शेख,बबलू शेख तसेच मंडळाचे सदस्य,स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अहेरी नगरीतील भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.