अहेरी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, गडचिरोली यांनी बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या प्रकरणात अर्जदार काँग्रेस नेते डॉ.अजय कंकडालवार यांनी तक्रार दाखल केली असून,बाजार समितीच्या निवडणुकीत व सभासद नोंदणी प्रक्रियेत नियमबाह्य प्रकार झाल्याचा आरोप केला आहे.
नोटीसमध्ये गैरअर्जदार म्हणून श्री.रविंद्र बाबा आत्राम सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरी) यांचे नाव नमूद करण्यात आले आहे.तसेच प्रकरणात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित (नोंदणी क्र. ३७३०) या संस्थेचाही संदर्भ देण्यात आला आहे.
तक्रारीनुसार,काही सभासदांची नावे नियमबाह्य पद्धतीने मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास वला विनियमन) अधिनियम, १९६३ अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणी संबंधितांना स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याचे आदेश देण्यात आले असून, दिनांक 25 मार्च २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता सुनावणी ठेवण्यात आली आहे.जर संबंधितांनी समाधानकारक उत्तर दिले नाही,तर एकतर्फी कारवाई केली जाईल,असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे.ही नोटीस जिल्हा उपनिबंधक जयसिंग केवळसिंग ठाकूर यांनी जारी केली आहे.
या प्रकरणामुळे अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून,आगामी सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Home मुख्य बातम्या अहेरी बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम यांचे पद धोक्यात…काँग्रेसचे कंकडालवार यांनी...




