



अहेरी : नुकतेच सिरोंचा येथे रुजू झालेल्या तहसीलदार निलेश होनमारे साहेब यांचे तालुका कांग्रेस कमेटी वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी सिरोंचा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीशभाऊ जवाजी यांनी तहसीलदार यांना सिरोंचा तालुक्यातील अनेक समस्यांबाबत माहिती दिली आणि या समस्या शासन स्तरावर पोहोचवून त्यांचे निराकरण करण्याची विनंती केली.नव्या तहसीलदार यांनी तालुक्याच्या विकासासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
त्यावेळी तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष सतीश जवाजी, नायब तहसीलदार सय्यद साहेब,निताताई तलांडी सामाजिक कार्यकर्ता, रवीभाऊ सल्लम माजी उपसरपंच,जेष्ठ कांग्रेस नेते एम.ए अली, sc सेल तालुकाध्यक्ष सारय्या सोनारी,अमडेली सरपंच सुरेश मडे, युवा कांग्रेस माजिद अली, मंचरला गणपती व आदी कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तित होते.