Home मुख्य बातम्या गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांची तात्पुरती बदली तात्काळ रद्द करा : अजय कंकडालवार

गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांची तात्पुरती बदली तात्काळ रद्द करा : अजय कंकडालवार

74
0

गडचिरोली : जिल्ह्यातील ज्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या जास्त आहे.अशा शाळेत पटसंख्या कमी असणाऱ्या शाळेतून शिक्षक देण्याकरीता मा.मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या माहिती नुसार मा.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी संबंधीत तालुका निहाय शिक्षकांची माहिती मागविण्यात आली.त्या माहितीनुसार मा मुख्य कार्यपालन अधिकारी साहेब व मा.शिक्षणाधिकारी साहेब(प्राथमिक) यांनी त्या माहितीच्या आधारे जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची तात्पुरती बदली आदेश काढण्यात आले.परंतु मा.गटशिक्षणाधिकारी साहेब यांनी गरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशांचे पालन न करता त्यांना खोटी माहिती देवून त्यांची दिशाभुल केली आहे.ज्या शाळेतील पटसंख्या कमी आहे.अशा शाळेतील शिक्षकांना केंद्रातील शाळेत किंवा लगतच्या शाळेत देणे असे असतांना मा.गटशिक्षणाधिकारी यांनी एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात व एका शाळेतून काढून त्या शिक्षकांच्या ठिकाणी दुसऱ्यांची नियुक्ती करणे असे अहेरी तालुक्यासह संपुर्ण
जिल्ह्यात सुद्धा अनेक आदेश चुकीचे काढण्यात आले आहे.तरी या प्रकरणाची संपुर्ण चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दिशाभुल व फसवणुक केल्याचा गुन्हा नोंद करून त्यांचे वेतन कमी करण्याची व त्यांना निलंबित करण्याची कार्यवाही करा.अशी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी मुख्यकार्यपालन अधिकारी व शिक्षणअधिकारी यांच्या कडे निवेदन देऊन मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here