Home मुख्य बातम्या धुमाकूळ घालणाऱ्या रानटी हत्तीचा बंदोबस्त करा : अन्यथा आंदोलन करण्याचा स्वराज फाऊंडेशन...

धुमाकूळ घालणाऱ्या रानटी हत्तीचा बंदोबस्त करा : अन्यथा आंदोलन करण्याचा स्वराज फाऊंडेशन जिल्हा गडचिरोली दिला इशारा

43
0

गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील सिरोंचा,आलापल्ली नंतर आता भामरागड वनविभागात रानटी हत्तीने एन्ट्री केली असून धुमाकूळ माजवला आहे.त्यामुळे परिसरात रानटी हत्तीची दहशत निर्माण झाली आहे.कोणतीही अनुचित घटना घडण्याच्या पूर्वी वनविभागाने रानटी हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्वराज फाऊंडेशन जिल्हा गडचिरोली पदाधिकाऱ्यांनी केली आहे.रानटी हत्तीचा बंदोबस्त न झाल्यास वनविभाग कार्यलयासमोर आंदोलन करू असा इशाराही दिला आहे.

२३ एप्रिल ला रात्रोच्या सुमारास रानटी हत्तीने चिरेपल्ली (कोत्तागुडम) येथील परशुराम सोयाम यांच्या घराचे नुकसान करत ताडगूडा गावात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पेरमिली वनपरिक्षेत्रातील आरेंदा मार्गे कोरेली गावात रात्रीच्या सुमारास त्या रानटी हत्तीने शेतातील घराचे नुकसान केले. २५ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील आज कियर गावात एका एसमाची हत्या केली त्या इसमाची नाव गोगुलू तेलामी गावालगतच्या जंगलात त्या रानटी हत्तीचा मुक्तसंचार सुरू असून याही परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावा लगत २०० मीटर अंतरावर रानटी हत्ती असूनही वन विभागाचे अधिकारी पोहोचले नसल्याचे गावकरी सांगत आहेत. गावाच्या अगदी नजीक रानटी हत्ती आला असल्याने नागरिक भयभीत झाले असून कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी वनविभागाने दखल घेत रानटी हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्वराज फाऊंडेशन जिल्हा गडचिरोली पदाधिकाऱ्यांनी केली असून तसे न झाल्यास वनविभाग कार्यलयासमोर तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here