Home राजकीय काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून हनमंतु गंगाराम मडावी यांची फेरनियुक्ती

काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून हनमंतु गंगाराम मडावी यांची फेरनियुक्ती

25
0

आल्लापल्ली : येथील सेवाभावी ,काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सेवानिवृत्त वन अधिकारी हनमंतु गंगाराम मडावी यांची काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडी विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून फेरनियुक्ती आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुरेश चिंचोळकर यांनी 22 जून रोजी केली आहे.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात मडावी यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचेसमवेत काँग्रेसचे युवा नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यावर विश्वास दाखल करून आपल्या समर्थकांसह भारतीय राष्ट्रीय  काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश केले होते.काँग्रेस पक्षात प्रवेशानंतर पक्षाचे हायकमांडने कंकडालवार यांची अहेरी विधानसभा समन्वयक म्हणून तर मडावी यांची आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केले होते.

अजयभाऊ कंकडालवार व हनमंतु मडावी या दोन्ही नेत्यांचे पक्षप्रवेश व नियुक्तीचे फलित लोकसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रात मविआ व काँग्रेसचे उमेदवार डॉ.किरसान यांना मिळालेल्या भारी लीडमधून सगळ्यांनाच पाहायला मिळाली.असे असतांना सुद्धा पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून दुसऱ्या एका कार्यकर्त्यांची निवड झाल्याची माहिती सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्याने याबद्दल मडावी समर्थकांमध्ये  नाराजी पसरली होती.

एकाच पदाचे दोन दोन जिल्हाध्यक्ष निवडीबद्दलची तक्रार राज्याचे विरोधी पक्षनेते यांच्या कानावर पडताच त्यांनी लगेच याविषयी पक्षश्रेष्टींसोबत चर्चा करून परत आल्लापल्ली येथील हनमंतु गंगाराम मडावी यांच्या नावाने आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून फेरनियुक्ती करायला भाग पाडले.

काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून फेर नियुक्ती झाल्याबद्दल हनमंतु मडावी यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार, आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुरेश चिंचोळकर,जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,ऍड.राम मेश्राम,ज्येष्ठ नेते हसनभाई गिलानीसह  पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here