अहेरी : एका पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आणि पार्वती यांचा ज्या दिवशी विवाह झाला, तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस असे म्हटले जाते.तसेच या दिवशी अनेक जण शंकर-पार्वती यांचा विवाहदेखील लावतात एका पौराणिक कथेनुसार ज्या दिवशी भगवान शिवाचा देवी पार्वतीशी विवाह झाला होता.तो दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो.
तालुक्यातील वांगेपल्ली घाट येथील भगवान श्री.शिवशंकर मंदिर ठिकाण दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा वांगेपल्ली येथे भव्य महाशिवरात्री यात्रा महोत्सव मोठ्या उत्सहात भरवण्यात आले आहे.येथील महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येते.या वर्षी सुद्धा यात्रा ठिकाणी जय बजरंगबाली नाट्य दंडार कला कृती चेक बेरडी प्रस्तुत’दिवा लावला पोरीने’लेक लाडकी बापाची कार्यक्रम आयोजित केली आहे.
या कार्यक्रमाचे आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.तसेच त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी येथील समस्त नागरिकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाला आर्थिक मदत करण्यात आली आहे.त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी भगवान श्री.शिवशंकर यांचे विविध पूजा अर्चना करून दर्शन घेतले.कार्यक्रमचे सहउदघाटक म्हणून आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हनमंतु मडावी हे होते.
यावेळी दिलीप मडावी सरपंच वांगेपल्ली, झाडेभाऊ,कल्पनाताई मडावी ग्रामपंचायत सदस्य, प्रशांत गोडसेलवार नग पंचायत नगरसेवक अहेरी,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,अज्जू पठाण माजी सरपंच आलापल्ली, राजू दुर्गे, गणेश चौधरी,सचिन पांचर्या,प्रमोद गोडसेलवार आदी उपस्थित होते.
Home अहेरी वांगेपल्ली येथील महाशिवरात्री यात्रा निमित्त ‘दिवा लावला पोरीने’लेख लाडकी बापाची नाट्यप्रयोगाचे उदघाटन...