अहेरीटुडे न्युज नेटवर्क / सिरोंचा तालुका प्रतिनिधी ( Sironcha )
सिरोंचा तालुक्यातील 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंकीसा,आसरअल्ली परिसरात अचानक रात्रीच्या वेळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता, त्या वादळी वाऱ्यामुळे दुब्बापल्ली गावातील गोर गरीब कुटुंब दुर्गम पोचम यांचे घराचे टिन हवेत उडून गेली आहे.या घटनेत दुर्गम कुटुंबियांना जीवितहानी झाली नाही.दुब्बापल्ली गावाचे दुर्गम पोचम यांचे कुटुंब अत्यंत गोर गरीब कुटुंब असून अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कुटुंब रस्त्यावर आली आहे.या समस्येची दुब्बापल्ली गावातील नागरिकांनी मूलकला मदत फाउंडेशनचे अध्यक्ष – सागरभाऊ मूलकला,याना माहिती देतच त्वरित त्यांनी त्यांचे वेळाचे विलंब न करता त्यांचे फाउंडेशनचे टीमला घेऊन दुब्बापल्ली गावातील दुर्गम पोचम कुटुंबियांचे घराची पाहणी केली आहे, त्यावेळी कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंच्या आर्थिक मदत करण्यात आली आहे
त्यावेळी मूलकला मदत फाउंडेशनचे सदस्य राजू मूलकला, उदय मूलकला, कल्याण मूलकला, राजम मूलकला, स्वामीराज मूलकला यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते