अहेरी : तालुक्यातील रेगुलवाही येथील सिद्दु कुळमेथे व राकेश कुळमेथे यांच्या घराला अचानक आग लागल्याची घटना दुपारी एक ते दिड वाजताच्या सुमारास घडली. पाहता पाहता संपूर्ण घर आगीच्या कवेत गेल्याने संपूर्ण घर जाळून खाक झाले.यात कुळमेथे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घटनास्थळी भेट देऊन विचारपूस करून आर्थिक मदत केली.
कुळमेथे कुटुंब बाहेर गावाला लग्नकार्याकरिता गेले होते. घरात कोणीही नसतांना अचानक आग लागली यात घरातील संसारोपयोगी साहित्यासह संपूर्ण घर जळून खाक झाले.यात कुळमेथे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याबाबत आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होतास घटनास्थळी धाव घेत घटनेबाबत जाणून घेतले व घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना सांगून लवकरत लवकर पंचनामे करून कुळमेथे कुटुंबाला शासनाकडून मदत करण्यात यावी म्हणून सांगितले आहे. दरम्यान कंकडालवार यांनी कुळमेथे कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूसाठी आर्थिक मदत केली.
यावेळी अजय नैताम माजी जि.प.सदस्य,लिंगा वेलादी माजी सरपंच मुळेवाही,श्रीनिवास तलांडे ग्रामसभा सचिव रेगुलवाही,गणपत नैताम,सिदु कुळमेथे, भगवान गावडे, मुत्ता मडावी,किस्टा नैताम,कमला नैताम,जगु कुळमेथे,प्रभाकर पेंदाम, राकेश गावडे,लच्चा गावडे,राकेश गावडे,सुरेश कुळमेथे,कृष्णा वेलादी,अमृताबाई आलाम,रमाबाई गावडे, लच्चा मडावी, समय्या कोडापे,राकेश कुळमेथे,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायत माजी उपसरपंच कार्तिक तोगमसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Home मुख्य बातम्या आगीत घर जळून खाक ; नुकसानग्रस्त कुटुंबाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी...