Home अहेरी वाघेझरी येथील ‘माऊली’ नावाचं नाट्यप्रयोगाचे अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

वाघेझरी येथील ‘माऊली’ नावाचं नाट्यप्रयोगाचे अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

33
0

एटापल्ली : तालुक्यातील वाघेझरी येथील नवयुवक संयुक्त मित्रमंडळाकडून आयोजित माऊली नावाचं नाट्यप्रयोगाचे उदघाटन काँग्रेस पक्षाचे विधानसभा प्रमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पार पडला.

उदघाटनीय मार्गदर्शन करतांना कंकडालवार यांनी म्हणाले कि,आजच्या या डिजिटल काळात सुद्धा ग्रामीण भागात नाटकांचे महत्व अबाधित असून नाट्यप्रयोगाचे सादरीकरणातून समाजात जनजागृतीचे कार्य होत असतात.आणि यातून समाजाचे परिवर्तन ही होत असतात.

या कार्यक्रमाचे सह उदघाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते.अध्यक्ष म्हणून अध्यक्ष नंदूभाऊ मट्टमी – सचिव प्रज्वल नागूलवार – अध्यक्ष सुधाकर गोट्टा होते.

यावेळी उदघाटन प्रसंगी परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नगरपंचायतचे सभापती नगरसेवक – मंडळाचे पदाधिकारी सदस्यसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here