Home अहेरी ताडाच्या झाडावरून खाली पडून जखमी झालेल्या इसमाला अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत

ताडाच्या झाडावरून खाली पडून जखमी झालेल्या इसमाला अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत

37
0

अहेरी : तालुक्यातील मेडपल्ली येथील नागरिक तिरुपती पेंदाम हे रविवार ला रोजी सायंकाळच्या सुमारास ताडीचे दारू काढण्यासाठी झाड चढले होते.यात त्यांचा पाय घसरल्याने ताडाच्या झाडावरून खाली पडले.यात त्यांचा कमरेला गंभीर दुःखापत झाली.त्यांना तात्काळ उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मेडपल्ली येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आविसं काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना देताच त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त इसम तिरुपती पेंदाम यांची ताब्यतीची आस्थेने विचारपूस करून त्यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदत दिली.यावेळी पेंदाम कुटुंबियांनी कंकडालवार यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केले.

अपघातग्रस्त पेंदाम यांना आर्थिक मदत करतांना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे सोबत मेडपल्ली ग्रामपंचायत सरपंच निलेश वेलादी,ग्रामपंचायत सदस्य कल्पना तलांडे,मधुकर गावडे,प्रकाश तलांडे,दिवाकर तलांडे,अविनाश मडावी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here