Home मुख्य बातम्या सिरोंचाचा कलेक्टर आंबा जीआय मानांकन घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचणार : शेतकऱ्यांच्या बांधावर...

सिरोंचाचा कलेक्टर आंबा जीआय मानांकन घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचणार : शेतकऱ्यांच्या बांधावर बी बियाणे – खते वेळेत पोहचवा- कृषि मंत्री गडचिरोली जिल्ह्यातील कृषी विषयक उपक्रमांचे केले कौतुक खरीप हंगाम पूर्व बैठकीत जिल्ह्याकडून सादरीकरण

107
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / सिरोंचा प्रतिनिधी ( Sironcha )

गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात आढळणारा कलेक्टर आंबा यावेळी जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना भेट म्हणून दिला. यावेळी प्रधान सचिव यांनी या आंब्याचे जीआय मानांकन घेऊन आंब्याची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवावी अशा सूचना कृषी अधिकारी यांना दिल्या. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा व अहेरी या भागात कलेक्टर आंबा या प्रजातीची 800 ते 1000 झाडे असून यातून स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असते. जी आय मानांकनासाठी कृषी विभागाकडून प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर याची विक्री करणे त्यामुळे सोपे जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here