Home मुख्य बातम्या वांगेपल्ली गावातून जाणाऱ्या जड़ वाहनांना बंद करा : आविसंचे नेते व...

वांगेपल्ली गावातून जाणाऱ्या जड़ वाहनांना बंद करा : आविसंचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार व उपसभापती रविंद्रबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम आंदोलन करू

112
0

AHERI TODAY / अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी तालुक्यातील वांगेपली गावातून दररोज जड़ वाहन आलापली ते अहेरी मार्गावरून तेलंगाणा व तेलंगाणावरून वांगेपली मार्गी जड़ वाहतूक जात असून गावातील रस्ते खराब होत आहेत तसेच नागरिकांना व व्यापाऱ्याना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामूळे सदर रस्त्यांवरील जड़ वाहन बंद करावे अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा प.स.अहेरी अंतर्गत येणाऱ्या ग्रा.प.वांगेपल्ली येथील सरपंच उपसरपंच सदस्य व गावातील नागरीकांनी दिली आहे.प्राप्त माहिती नुसार सदर रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे येत असून या रस्त्यांवर जड़ वाहनांना वाहतुकीस या मार्गावरून रहदारी करण्यास प्रवेश बंदी असतो,मात्र जड़ वाहन सुरू असल्याने खड्डे पडून रस्ता खराब होत आहे, व अपघात होण्याची दाट शक्यता आहे तसेच नागरिकांना नाहक त्रास सहन करावं लागत आहे त्यामूळे सदर रस्त्यावरून जड़ वाहन बंद करावे.व काही दिवसापूर्वी या मार्गांवर जड़ वाहतुकीस बंदी असल्याचं फलक लावण्यात आले आहे.तरी जड वाहतूक अद्याप बंद झालेले नाही.करीता वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,उपसरपंच राजेश कोतपल्लीवार,सदस्य संजय आत्राम,कल्पना मडावी,प्रियंका तोडसाम,निलेश आलाम,दुर्गे,संतोष येरमे,महेश नैताम, बाबुराव नागपुरे,ईश्वर सिडाम, व गावकरी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी यांना निवेदन देऊन सदर मार्गावरील जड़ वाहतुकीस बंद करण्याच्या निर्देश देण्यात यावी अन्यथा आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार व आविसं नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती रविंद्रबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजमा आंदोलन करण्यात येईल अशा इशारा नागरिकांडून देण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here