मुलचेरा : तालुक्यातील कोपरल्ली येथील शंकर रतनपुरे यांना कॅन्सर या गंभीर आजाराने ग्रासले असून त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने आवश्यक उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचण होत आहे.ही समस्या तालुक्यातील आविसं काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना मुलचेरा तालुक्यातील दौऱ्यावर असतांना सांगितले होते.
त्यावेळी आविसं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कॅन्सरग्रस्त शंकर रतनपुरे यांच्या घरी भेट देऊन त्यांची तब्बेतीची आस्थेने विचारपूस करून रतनपुरे परिवाराला औषध उपचारासाठी आर्थिक मदत केली.त्यावेळी अजयभाऊंनी सांगितली की पुढील कोणत्याही समस्या असो मला सांगा मदत करण्यासाठी मी तयार अहो असे गावातील नागरिकांना व रुग्णना सांगितले.
यावेळी काँग्रेस मुलचेरा तालुका अध्यक्ष प्रमोद गोटेवार,मुलचेरा नगरपंचायतचे नगरसेवक उमेश पेळूकर,ऍड.अकुदारी,रवी झाडे,सुबोले मंडल,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Home अहेरी कोपरल्ली येथील कॅन्सरग्रस्त ग्रस्ताला उपचारासाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत