आरमोरी : आमदार कृष्णा गजबे यांच्याकडून विधानसभा मतदारसंघातील विकासाला गती मिळावी व ग्रामस्थांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आमदार कृष्णा गजबे यांनी गुरुवारला मौजा दवंडी येथे ग्रामस्थांची भेट घेतली.त्याच बरोबर त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत दवंडी-भाकरोंडी-खांबाला-मुस्का रस्ता बांधकाम करणे.अंदाजित किंमत 1246.8 लक्ष या कामाचे भामिपुजन केले व काम लवकर सुरू करण्याचे निर्देश ठेकेदाराला दिले.यावेळी आमदार कृष्णा गजबे म्हणाले की, रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यास ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. त्याच वेळी, यामुळे त्यांना ये-जा करणे सोयीचे होईल आणि वेळेची बचत होईल. त्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यात होणाऱ्या त्रासातूनही दिलासा मिळणार असल्याचे आमदार आमदार गजबे यांनी सांगितले.त्याचबरोबर काही ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याचीही माहिती मिळत असून, लवकरच रहिवाशांची ही समस्या दूर होणार आहे.याप्रंसगी माजी जि.प सदस्य लताताई पुंनगाटे,माजी सभापती बग्गुजी ताडाम, ओमकार मडावी सोशल मीडिया सहसंयोजक, भाईचंद गुरनूले, रामहरी चोधरी, जयदेव पा किरंगे, ऋषी कुमरे, सिगुजी ताडाम, रावण पदा, दादाजी किरगे तसेच परिसरातील प्रतिष्ठित व गावचे नागरिक उपस्थित होते.