मूल : तालुक्यातील चांदापूर फाट्याजवळ बस आणि ट्रकचा अपघात घडल्याची घटना आज सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांचे दरम्यान घडली.मूल वरून एम एच 40 9318 क्रमांकाची बस प्रवाशी घेऊन सुखरूप चामोर्शी ला जात होती. बस चांदापूर फाट्याजवळ येताच खेडी मार्गावरून भरधाव येणाऱ्या ट्रकने बसच्या मधोमध धडक दिली. ट्रकची धडक मोठी असल्याने बस मधील आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. काही प्रवाश्यांच्या डोक्याला मार लागला असून काहीना गुप्तीमार बसला आहे.जखमी झालेल्या प्रवाशांना मूल येथिल उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.अपघात घडल्याची माहिती होताच चंद्रपूर फाट्यावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहे.बस-ट्रकचा अपघात, 8 ते 10 प्रवासी जखमी