Home अहेरी अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना तातडीने...

अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना तातडीने निलंबित करा

88
0

अहेरी टुडे तालुका प्रतिनिधी अहेरी ( Aheri )

चामोर्शी येथेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना चामोर्शी पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी सकाळी ५ वाजता बेदम मारहाण केली, ह्यात त्यांचे एक हात तुटुन ते गँबीर जखमी झाले आहेत, सद्या त्यांचे गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे, ह्या अमानुष मारहाणीचा घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील समस्त कोमटी समाजात संतापाची लाट पसरली असून त्यांनी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे ह्यांच्यावर त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे

अहेरी तालुक्यातील अहेरी, आलापल्ली आणि नागेपल्ली येथिल आर्य वैश्य कोमटी समाजातर्फे जिल्हाधिकारी गडचिरोली यांना तहसीलदार अहेरी मार्फत आज एक निवेदन देत पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना त्वरित निलंबित करीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे, येत्या २ दिवसात कारवाई झाली नाही तर अहेरी तालुक्यातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद करण्याचा इशाराही ह्या निवेदनातुन देण्यात आले आहे

निवेदन देतांना अहेरी, आलापल्ली, नागेपल्लीसह अहेरी तालुक्यातील कोमटी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here