मुलचेरा : तालुक्यातील बंदूकपल्ली येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला.यावेळी मा.प.पु.संत श्री.मुरलीधर महाराज यांचा प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं आहे.
मुलचेरा तालुक्यातील बंदूकपल्ली येथे मागील अनेक वर्षांपासून येथील एका कुळाच्या घरामध्ये श्रीगणराया,शिवजी व हनुमानाची मूर्तिची स्थापना करून गावकरी पूजा अर्चना करित होते.परंतु कुळाचे घर जीर्ण झाल्याने पूजा अर्चना व भजन करणे धोकादायक ठरत होते.
बंदूकपल्ली येथील गावकरी व भक्तजणांनी काँग्रेस नेते कंकडालवार यांची भेट घेऊन गावासाठी स्व:खर्चाने मंदिराचे बांधकाम करून देण्याची विनंती केली होती.
बंदूकपल्ली येथील गावाकऱ्यांच्या व भक्तजणांच्या विनंतीला मान देऊन कंकडालवार यांनी मंदिराचे बांधकाम करून देण्याचे आश्वासन दिले होते.
काल गावकऱ्यांनी मंदिर बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रम आयोजित केले होते.या कार्यक्रमाला कंकडालवार यांनी उपस्थित राहून स्वहस्ते मंदिराचे भूमिपूजन केले होते.यावेळी काँग्रेस नेते हणमंतू मडावी सुद्धा हजर होते.
मंदिर बांधकाम भूमिपूजनाचे कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.यावेळी गावकरी व भक्तजणांनी कंकडालवार यांच्या धार्मिक सत्कार्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे मनपूर्वक आभार मानले.
Home अहेरी काँग्रेस नेते कंकडालवार यांच्या हस्ते श्रीगणरायाचे मंदिर बांधकामाचे भूमिपूजन संपन्न..काँग्रेस नेते कंकडालवार...





