गडचिरोली : बतुकम्मा उत्सव”हा”तेलंगणासह गडचिरोली जिल्ह्यातील एक नियतकालिक उत्सव आहे”जो”नऊ दिवस चालतो आणि नवरात्री दरम्यान असतो. प्रदेशातील विविध विलक्षण फुलांनी बतकाम्मा साजरी केली जाते.आणि गडचिरोली जिल्ह्यातील सुद्धा लोकांच्या सहयोगी भावनेचे प्रतीक आहे.ही बतकम्मा प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि यशासाठी देवीची प्रार्थना करण्यासाठी आहे.
अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली येथील नवरात्री -बतकम्मा तथा शारदा उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करतात.”या”उत्सहात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी घेऊन DJ बॉक्स लावून सामूहिक नूत्य करतात.रेपनपल्ली येथील महिलांना बतकम्मा उत्सव साजरा करण्यासाठी DJ सिस्टम नसल्याने नवरात्री – बतकम्मा दिवशी अडचण भासत होती.”ही”बाब आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे महिला नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती सुरेखाताई आलम यांना रेपनपल्ली येथील महिला वर्ग सांगितले असता सदर माहिती आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देताच तात्काळ बतकम्मा उत्सव वेळी रेपनपल्ली महिलांना DJ साऊंड सिस्टम माजी पंचायत समिती सभापती सुरेखाताई आलम यांच्या हस्ते देण्यात आली.त्यावेळी रेपनपल्ली महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले.त्यावेळी अजयभाऊंची समस्त नागरिक – महिला वर्गांनी आभार मानले.
यावेळी उपस्थित अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती सुरेखाताई आलम,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,इर्शाद शेख,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.