अहेरी : विधानसभा निवडणुकीची नामांकनाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस समर्पित अपक्ष उमेदवार अन् आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने काल राज्याचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांचा आशीर्वादाने आणि काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत नामांकन दाखल केले.
काल काँग्रेस समर्पित उमेदवार हनमंतू मडावी यांनी अहेरी येथील वासवी सेलिब्रेशन हॉल येथून आपले नामांकन दाखल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार महारॅली काढत विरोधकांना जोरदार चपराक दिले.
नामांकन दाखल केल्यांनंतर काँग्रेसचे अहेरी विधानसभा समन्वयक अजय कंकडालवार यांनी वासवी सेलिब्रेशन हॉलमध्ये झालेल्या सभेत हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अन् नागरिकांना संबोधित केले.
यावेळी अजयभाऊ कंकडलवार यांनी सभेला संबोधित करतांना स्वातंत्र्याच्या पंच्यात्तर वर्षानंतर सुध्दा अहेरी विधानसभेत अनेक समस्या आवसून उभे असून याला येथील आजी – माजी मंत्री कारणीभूत असून आजही रोजगार,रस्ते,शिक्षण,आरोग्य,उद्योग आणि दळणवळणाची अभाव असून मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिक अत्यंत दयनीय अवस्थेत आपले जीवन जगत आहे.या विधानसभेची चित्र बदलण्यासाठी हनमंतू मडावी साहेबांसारखे निःस्वार्थ चेहरा आवश्यक असल्याने कार्यकर्त्यांनी मडावी साहेबांना निवडून आणण्यासाठी पराकाष्ठा करावे,असे विनंतीवजा आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
काँग्रेस समर्पित अपक्ष उमेदवार हणमंतू मडावी यांच्या नामांकनाला समर्थन दर्शविण्यासाठी विधानसभा क्षेत्रातल्या पाचही तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते अन् नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.हणमंतू मडावी यांची नामांकनाला झालेली गर्दी हे अहेरीकरांची लक्ष वेधून घेत होती.
Home अहेरी हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने काँग्रेस समर्पित अपक्ष उमेदवार हनमंतू मडावी यांनी केले नामांकन...