गडचिरोली : आल्लापल्ली येथील सेवाभावी,काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सेवानिवृत्त वन अधिकारी हनमंतु गंगाराम मडावी यांची काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडी विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून फेरनियुक्ती आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुरेश चिंचोळकर यांनी 22 जून रोजी केली आहे.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात मडावी यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व स्वीकारत समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.काँग्रेस प्रवेशानंतर कंकडालवार यांची अहेरी विधानसभा समन्वयक म्हणून, तर मडावी यांची आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती.
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी काँग्रेसमधील पक्षप्रवेश लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डॉ.किरसान यांच्यासाठी फायदाचा ठरला.आज आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांची आलापल्ली येथील निवास्थानी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
शुभेच्छा दरम्यान चंदू बेज्जालवार,अज्जू पठाण,रज्जाक पठण,स्वप्नील मडावी,सचिन पंचार्य,सच्चू शेख, प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.