Home अहेरी जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते डॉ.चेतन अलोणे यांचे सत्कार

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते डॉ.चेतन अलोणे यांचे सत्कार

66
0

अहेरी : अहेरी येथील युवक डॉ.चेतनभाऊ अलोणे यांनी MPSC परीक्षेत उत्तीर्ण होऊन पशुधन विकास अधिकारी या पदावर नोकरीला लागले आहे.यामुळे त्यांनी अहेरी शहराची व जिल्ह्याची नावलौकीक केले आहे.

डॉ.अलोणे यांची अहेरी हे कर्मभूमी असून आज आविसं व काँग्रेसचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.सदर सत्कार कार्यक्रम अहेरी येथील अजयभाऊ कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडला.

यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी डॉ.चेतन अलोने यांच्याबद्दल गौरवशाली मत व्यक्त केले. गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी हळूहळू का होईना पण,MPSC व UPSC परीक्षांमध्ये भाग घेत ऊत्तीर्ण होऊन गडचिरोली जिल्ह्याचे व आपल्या क्षेत्राचे नाव लैकिक करत असल्याने हे आपल्यासाठी गौरवाची बाब असल्याचे त्यानीच म्हंटले.

सत्कारा दरम्यान माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,स्वप्नील मडावी,प्रकाश दुर्गे,नरेंद्र गर्गमसह आविसं व काँग्रेसचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here