आलापल्ली : अहेरी तालुक्यातील आलापल्ली शहरामधील बिरसा मुंडा चौकातील नागरिकांनी आज सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा काँग्रेसचे नेते हनमंतु जी.मडावी यांची भेट घेतली.व त्यांच्यासोबत विविध विषयांवरती चर्चा केली हनमंतु जी.मडावी मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्व स्वयमी शांत निर्मल स्वभावाचे हनमंतु मडावी”हे”आविसं – काँग्रेसचे युवा नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कांकडालवार यांच्या नेतृत्वात आलापल्ली येथे त्यांनी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला.
अहेरी विधानसभेत समोर 2024 निवळणुकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस कडून उमेदवार म्हणून उभे राहणार अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे.अहेरी विधानसभेत नवीन चेहरा रिंगणात उतरेल अशी सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.आलापल्ली शहरातील बिरासामुंडा चौकातील नागरिकांनी सेवा निवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा काँग्रेसचे नेते हनमंतु जी.मडावी यांच्या घरी भेट घेऊन.त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्यावर विश्वास ठेवून समोर च्या निवळणुकीत तुम्ही हमखास निवळून याला अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनता तुमच्या पाठीशी आहे.अहेरी विधानसभा क्षेत्राचा विकास कराल अशी अपेक्षा ठेवली
यावेळी काँग्रेसचे नेते हनमंतु मडावी यांनी नागरिकांना विश्वास दिला.की जर मला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात मला उमेदवारी मिळेल तर नागरिकांची सेवा करण्याचे मला वाट मिळेल.तर मी समस्त जनतेच्या विश्वासावार खरा उतरणार अशे आश्वासन हनुमंतु जी.मडावी यांनी दिले
यावेळी चर्चा दरम्यान रमेश मडावी,तूईलवार सर,व्येकटी मडावी,योगेश सडमेक,महेश मडावी,रितेश सडमेक,संजव जूनधारे,राहुल चौधरी,अतुल शेंडे,अतुल ठाकरे,लोकेश शेंडे,विमलबाई कोरेत,जीवेद पाठन,स्वप्नील मडावी,चिंटू आत्राम,रिंकू आत्राम,दिगविजय आत्राम,सचिन,सुशीला मडावी,कुसुम सडमेक,अनिता सडमेक,तुंडूलवार मॅडम,सर्दीय सडमेक,सुगना गेडाम,कमल मडावी,वनिता वेलदी,मडावीबाई,मनिष सडमेक,शेवंता मडावी,कविता आत्रामसह आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.